Thursday, November 21, 2024
HomeUncategorizedमुलांच्या मोबाईल व्यसन सोडण्याचे आठ उपाय

मुलांच्या मोबाईल व्यसन सोडण्याचे आठ उपाय

      *****आजकाल पालकांना भेडसावत असणारी प्रमुख समस्या म्हणजे मुलांचे मोबाईल व्यसन*****
याला व्यसनच म्हणावं लागेल कारण बऱ्याच वेळेस असे निदर्शनास आले आहे की शाळेच्या व्यतिरिक्त किंवा शिकवणीच्या व्यतिरिक्त बरेचशे मुले मोबाईलवर दोन ते चार तास आपला वेळ करतात, याबाबतीत आपण मोबाईल ला नाव ठेवण्यापेक्षा आपण मुलांच्या सवयीला नाव ठेवावे लागेल. मोबाईल हे आधुनिक काळातील एक अतिशय क्रांतिकारी साधन आहे परंतु कोणत्याही गोष्टीचा किंवा उपकरणाचा अतिरेक केला तर तो निश्चितच त्याचे घातक परिणाम पाहायला मिळतात. मुलांच्या बाबतीत असे म्हणता येईल मोबाईल मुळे संपूर्ण पिढी बरबाद होत आहे , हे शंभर टक्के खरे आहे परंतु याबाबतीत या क्रांतिकारी उपकरणाला नाव ठेवण्यापेक्षा मुलांची मोबाईलची सवय किंवा व्यसन कसे सोडता येईल याबद्दल विचार करु या
त्यातील काही अतिशय उपयोगी उपाय

नंबर एक : मुलांना जाणीव करून देणे ,हा एक चांगला उपाय आहे, मुलांना जर विश्वासात घेऊन जर मोबाईलच्या अति परिणामाची, अति वापराची व त्याचे दुष्परिणाम याची जाणीव करून दिली तर बऱ्याच अंशी फरक जाणवेल याबाबतीत पालकांनी त्यांच्या शिक्षकांची किंवा त्यांच्या आदर्श व्यक्तीची मदत घेऊ शकतात, बऱ्याच वेळेस मुलांना आपल्या आई-वडिलांचे म्हणणे पटत नाही परंतु ते जर त्यांच्या शिक्षकांनी त्यांना समजून सांगितले किंवा त्यांच्या आदर्श व्यक्तीने समजून सांगितले तर निश्चित त्या ऐकतील

नंबर दोन: मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे

हा एक चांगला उपाय आहे, जर मुलांना खेळासाठी प्रोत्साहित केले तर मुले निश्चितच मोबाईल पासून दूर राहू शकतात पण त्यासाठी पालकांची मानसिकता बदलावी लागेल व पालकांना प्रयत्न करावे लागतील. जेव्हा आपण मुलांना खेळण्यासाठी पाठवतो, एक तर त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होतो व ते ताण विरहित राहतात ,अशा वेळेस एवढाच वेळ ती मोबाईल पासून दूर होऊ शकतात, खेळण्यामुळे मुलांची हाडे बळकट होतात व त्याच्या आत्मविश्वास वाढतो

नंबर तीन: दुष्परिणाम दुष्परिणामाची जाणीव करून देणे

अति मोबाईल वापर वापरामुळे मानसिक व शारीरिक काय दुष्परिणाम होतात याबाबत मुलांना आपण अनेक माध्यमाद्वारे जाणीव करून देऊ शकतो उदाहरण घ्यायच असेल त्यांना आजूबाजूच्या परिसरातील मोबाईल व्यसनाधीन मुलांची उदाहरण देणे किंवा बऱ्याच वेळेस युट्युब वर अशा प्रकारचे व्हिडिओज आपण त्यांना दाखवू शकतो ,असे उदाहरण पाहिल्यानंतर मुलांची मानसिकता बदलते व ते स्वतःला मोबाईल पासून दूर ठेवू शकतात

नंबर चार: मोबाईल वापरण्याची वेळ निश्चित करून देणे

मोबाईल मुलांना वळण किंवा शिस्त लावणे हे पालकांचे प्रमुख कार्य असते. आपण मुलांना एक निश्चित वेळ मर्यादा देऊ शकतो जेणेकरून तो त्यावेळेस मोबाईल पाहू शकतो अर्थातच ती वेळ कमी असावी, प्रसंगी काही मुले शैक्षणिक वापरासाठी मोबाईल पाहतात परंतु त्याची वेळ निश्चित असावी आणि शक्यतो त्यांनी मोबाईल पालकांच्या देखरेखाली वापरली पाहिजेत, अर्थातच यासाठी पालकांची मानसिकता मजबूत असली पाहिजे

नंबर पाच: नो मोबाईल डे किंवा मोबाईल फ्री झोन संकल्पना
ही एक चांगली संकल्पना आहे घरात एक वेळ निश्चित करावी ज्या काळात शक्यतो कोणीच मोबाईल वापरणार नाही त्यामुळे सुसंवाद वाढेल वाढेल किंवा मोबाईलची सवय सुटू शकेल परंतु काही वेळेस अर्जंट कॉल करणे किंवा उचलणे अपरिहार्य असते त्यासाठी त्या काळात मुभा असावी मुलांसाठी एखादा वार किंवा रविवार मोबाईल फ्री डे ठेवायला हरकत नाही काही प्राप्त करायचे असते असेल तर काही उपाय निश्चित करावे लागेल व काय व काही बाबतीत समर्पण पण करावे लागेल त्याशिवाय कोणती ध्येय प्राप्त होत नाही

नंबर सहा : पालकांना आदर्श व्हावे लागेल

संकल्पना थोडीशी आव्हानात्मक आहे परंतु निश्चितच स्वागत आहे ,जर पालकांनी स्वतःहूनच मोबाईलचा वापर कमी केला तर मुले सुद्धा मोबाईलचा वापर कमी करावे लागतील कारण की शेवटी मुले पालकांच्या अनुकरण करतात ,जर वडील दिवसभर व्हाट्सअप वर असतील किंवा फेसबुक पाहत असतील तर मुलांना बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नसतो व मुले सुद्धा त्या बाबतीत त्यांच्या सूचनांचा आदर करत नाही
नंबर आठ: मोबाईल जशी आज आवश्यक बाब बनली आहे तशी फारच अत्यावश्यक बाब मानता येणार नाही त्यामुळे काही प्रसंगी उदाहरणार्थ, सहलीला गेल्यानंतर किंवा खेळताना पालकांनी स्वतः मोबाईलचा कमीत कमी उपयोग करावा कारण असे निदर्शनास आले आहे की जेव्हा पालक मोबाईल वापरत नाहीत तेव्हा त्यांची मुले मोबाईल वापरत असतात किंवा मुलांना मग्न ठेवण्यासाठी पालकच त्यांना मोबाईल देतात, अर्थातच या गोष्टीचा दूरगामी परिणाम होतो.
एखादी गोष्ट जेव्हा सतत आपण 21 दिवस करतो तर ती सवय बनते ,तीच पद्धत मोबाईलच्या बाबतीत लागू पडते जर आपण ह्या सवयी 21 दिवस अवलंबिया तर अर्थातच त्या सवयी बनतील कारण दोन वर्षे लॉकडाऊन मध्ये मुलांनी त्यांच्या परीने मोबाईलचा बऱ्याच प्रमाणात गैरवापर केला आहे ती सवय जाण्या

साठी आपल्याला किमान दोन महिने तरी मेहनत घ्यावे लागेल. काही डॉक्टरांच्या मते मोबाईल मुळे मुलांची मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडले आहेत आता या विषाची परीक्षा जास्त न घेतलेली बरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisingspot_img

Popular posts

My favorites

I'm social

0FansLike
0FollowersFollow
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe