Saturday, July 27, 2024
HomeSPOKEN ENGLISHदहा अंकाची किमया

दहा अंकाची किमया

खालील 10 अंकी गोष्टी नक्की तुमचे आयुष्य दहा वर्षांनी किंवा वीस वर्षांनी वाढवतील.
रोजच्या जीवनात वेळेला फार महत्त्व आहे, जर तुम्ही दररोज स्वतःसाठी काही मिनिटे दिलात तर नक्कीच तुम्ही तुमचे आरोग्य उत्तम प्रकारे राखु शकाल.

आता पहा दहा आकड्याची किमया

1 दहा मिनिटे व्यायाम:
खरंतर व्यायाम हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असला पाहिजे, साधे गणित आहे, जे शरीर आपण 24 तास वापरतो त्या शरीराला आपण अर्धा किंवा एक तास देणे आवश्यक आहे. परंतु या व्यस्त जीवनात आपण केवळ दहा मिनिटे जरी वेळ काढला तरी आपल्या शरीराला त्याचा प्रचंड फायदा होतो. सर्वांना व्यायामाचे फायदे माहिती आहेत तरीदेखील बरेच लोक त्यापासुन दूर होतात.
ज्या गोष्टीतून फायदा आहे ती गोष्ट आपण घेतलीच पाहिजे. कितीही व्यस्त असाल , तरी स्वतःसाठी आपण दहा मिनिटे काढलीच पाहिजे ,आम्ही आग्रह धरतो की दहा मिनिटाच्या ऐवजी तीस मिनिटे दररोज व्यायाम केलाच पाहिजे. वेळ नसेल तर दहा मिनिटे योगा जरी केले किंवा कोणता व्यायामाचा प्रकार केला तरी देखील त्याचा प्रचंड फायदा होतो.

2.  दहा मिनिटे वाचन:
जसे पोटाला अन्न पाहिजे ,तसे मेंदूला किंवा मनाला वाचन पाहिजे .वाचन हे मेंदूची अन्न आहे .पूर्वी लोक पुस्तक वाचण्यासाठी प्रचंड आग्रही दिसायचे, परंतु सध्या मोबाईल मुळे कित्येक लोकांनी वाचन सोडून दिले आहे. मोबाईलचे व्यसन हे वाचनासाठी दुश्मन आहे. दररोज झोपण्यापूर्वी दहा ते वीस मिनिटे जर वाचन केले तर मानसिक तणाव जवळपास 70 ते 80 टक्के कमी होतो असे तज्ञांची मत आहे. यामुळे मन देखील शुद्ध होते व झोप पण छान लागते.

3. दहा मिनिटे अंग मेहनत:
घरातील कोणते काम, त्यामध्ये फरशी पुसणे, झाडलोट, बांगकाम, साफसफाई हे अंग मेहनतीमध्ये मोडतात, हा एक प्रकारचा व्यायाम समजावा, इतकेच काय रिक्षा टॅक्सी न वापरता ,जर आपण पायी चाललो तरी देखील एक प्रकारचा व्यायाम होतो त्यामुळे शरीर फिट राहते.

नंबर 4: 10 भाजीपाला फळे
फळे व भाजीपाला हे आपल्या आयुष्यमान वाढवतात. दररोज वेळ काढून दिवसातून दहा भाग तरी नैसर्गिक आहार घेतला पाहिजे. त्या 10 भागांमध्ये कोणत्या प्रकारचे भाजीपाला व फळे प्रमाणित केली जाऊ शकतात. असे म्हणतात की जे लोक फळे व भाजीपाला खातात त्यांचे आयुष्यमान 42% ने वाढते.

नंबर 5: 10 मिनिटं ध्यान धरणा
मनाला नियंत्रण करण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे ध्यानधारणा. त्यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य नियंत्रित राहते, ताणतणाव निद्रानाश मनाची चंचलता यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे ध्यानधारणा होय. पाच वेळा हळूहळू श्वास घ्यावे, डोळे बंद असावेत, या अवस्थेत डोक्यापासून ते पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाची जाणीव करून घ्यावी. श्वास घेताना आपल्या इच्छित देवतांचे स्मरण करावे व सोडताना त्या देवाचे स्मरण करावे. तुम्ही जेव्हा हे कराल निश्चितपणे तुम्हाला फरक जाणवेल.

नंबर 6:दहा ग्लास पाणी
आपले शरीर व त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे अत्यंत आवश्यक असते. पाणी पिण्याचे अगणित फायदे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे किडनी विकार होण्याचे धोका कमी असतो, वजन नियंत्रणात राहते. दररोज दहा ग्लास पाणी आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपले शरीर हेच बरेच रोगापासून दूर राहते. अपचन, बद्धकोष्ठता अशा अनेक प्रकारच्या विकारापासून जूर राहता येते.

नंबर 7: दहा मिनिटे बदाम पिस्ते किंवा ड्रायफूट का खा
जे लोक सुकामेवा म्हणजेच बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते खातात. त्यांचा आयुष्य निश्चितपणे वाढते, याच्या सेवनाने हृदयविकार किंवा अतिरक्तदाब यांचा धोका कमी होतो. एक तर कमी कॅलरीज जातील व सर्व प्रकारचे पोषणद्रव्य आपल्याला या सुक्यामेवामुळे मिळतात ,परिणामी शहराचे वजन  नियंत्रण राहील.

नंबर 8: दहा मिनिटे सुसंवाद
आजच मोबाईल मुळे किंवा सोशल मीडियामुळे सुसंवाद संपला आहे. परिणामी राग, मानसीक ताणतणाव यांचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल हे एकमार्ग संवाद आहे. परंतु जेव्हा आपण प्रत्यक्ष बोलत असतो किंवा संवाद करत असतो त्यावेळेस मनावर दडपण कमी होते. त्यासाठी आपण आपल्या मित्रांसाठी, घरच्यांसोबत किमान दहा मिनिटे मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. मोबाईल पेक्षा प्रत्यक्ष भेटून बोलणे हे अधिक परिणामकारक आहे. शेवटी वेळ नसेल तर किमान मोबाईलवर तरी दहा ते पंधरा मिनिटं मनसोक्त गप्पा मारल्या पाहिजेत. विनोद करा, मनमोकळेपणे हसा, यामुळे मन हलके होईल व त्यानंतर ताणतणाव कमी होईल हे निश्चित. 

नंबर 9: दहा चांगले मित्र
असे म्हणतात संगत रंगत आणते. जर तुम्हाला दहा चांगले मित्र असतील, तर ते तुमचे जीवन स्वर्ग करतील. जेवढे कल्याण आई-वडोल करू शकत नाहीत, तेवढे कल्याण चांगले मित्र करतात.

नंबर 10: दहा चांगल्या सवयी
मनुष्य हा सवयींचा गुलाम असतो. Habits are the shirts made of irons. चांगल्या सवयी चांगले आयुष्य घडवितात. त्यामुळे कोणत्याही दहा चांगल्या सवयी आपणास असाव्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisingspot_img

Popular posts

My favorites

I'm social

0FansLike
0FollowersFollow
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe